कोल्हापूर : गोकुळ दूध विक्री दरात वाढ

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळन) आज म्हैस दुध विक्री दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ केली आहे.
Gokul Milk
Gokul MilkSakal
Summary

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळन) आज म्हैस दुध विक्री दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ केली आहे.

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळन) (Gokul Milk) आज म्हैस दुध (Buffalo Milk) विक्री दरात प्रतिलिटर 4 रुपयांची वाढ केली आहे. शेतकऱ्यांना (Farmer) प्रतिलिटर दोन रुपयांची खरेदी वाढ देवून, चार रुपये विक्री दर ग्राहकांच्या बोकांडीवर बसवला आहे. उद्या (ता. 16) पासून ही दरवाढ लागू केली आहे. 

गोकुळने दोन आठवड्यापूर्वी दूध खरेदी दरात प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. त्यानंतर दूध विक्री दरात वाढ करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता, मात्र दूध खरेदी दर वाढल्यानंतर दोन रुपय विक्री दरात वाढ होणार अशी अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र म्हैस दुधासाठी प्रतिलिटर चार रुपयांची वाढ करुन ग्राहकांना घाम फोडला आहे.

पेट्रोल, डिझेल, गॅस दरात वाढीमुळे नाकीनऊ आलेल्या ग्राहकांना आता दूधदरवाढीचा चटका बसणार आहे. कोल्हापूर शहर व जिल्ह्यामध्ये फुल क्रीम दूधाच्या ग्राहक दूध दरात नाईलाजास्तव वाढ करण्यात येत असल्याचे गोकुळकडून जाहीर करण्यात आले आहे. गोकुळ ब्रॅण्डच्या फुल क्रिम दूध (200 मिली पॅक), प्रमाणित, गाय व टोण्ड दुुधाच्या विक्री दरात कोणताही बदल केलेला नसल्याचेही गोकुळने सांगितले आहे. या दरवाढीमुळे गोकुळला प्रतिदिन सुमारे 40 ते 45 लाख रुपयांचा फायदा होणार आहे.

असे होणार दूध दरवाढ

दूधाचा प्रकार* पॅकिंग* सध्याचा विक्री दर* वाढीव विक्री दर

फुल क्रिम दूध*1 लिटर*54.00 रुपये * 58.00 रुपये

फुल क्रिम दूध* 500 मिली*27.00 रुपये * 29.00 रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com