gokul milk union inquiry kolhapur
esakal
कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) सभासद संस्थांची चौकशी आजपासून सुरू (Gokul Milk Union Inquiry) झाली. चौकशी अधिकारी सांगलीच्या सहायक निबंधक (दुग्ध) दीपा खांडेकर आणि लेखापरीक्षक ए. एस. पैलवान दोघांनीही दिवसभर गोकुळ शिरगाव येथील मुख्य प्रकल्प कार्यालयात थांबून माहिती घेतली.