
सोशल मिडियाद्वारे पोस्ट करुन त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.
कोल्हापूर - सतेज पाटील यांना कोरोनाची लागण
कोल्हापूर - मागील काही दिवस जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पहायला मिळत आहे. वाढत्या रुग्णांच्या संख्येमुळे प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. दरम्यान, जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांना कोरोनाचा लागण झाली आहे. त्यांनी सोशल मिडियाद्वारे (Social Midea) पोस्ट करुन याबाबत माहिती दिली आहे.
फेसबुकला शेअक केलेल्या पोस्टमध्ये ते लिहतात, त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आत्ताच माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी घरीच उपचार घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना विनंती आहे की त्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
हेही वाचा: बीचवर अपघात; भरधाव कारने ६ पर्यटकांना चिरडलं, एकाचा मृत्यू
दरम्यान, त्यांनी काल प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic Day 2022) जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावली होती. त्यामुळ त्यांनी संपर्कात आलेल्या सर्वांना टेस्ट करुन घेण्याचे आवाहन केले आहे. कोल्हापुरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ-घट सुरु आहे. प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. याशिवाय जिल्ह्यात लसीकरणाचा वेग वाढवला असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Web Title: Kolhapur Guardian Minister Satej Patil Corona Positive
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..