
बीचवर अपघात; भरधाव कारने ६ पर्यटकांना चिरडलं, एकाचा मृत्यू
पालघर : वर्धा जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तब्बल सहा विद्यार्थ्यांचा अपघाताची मृत्यूची घटना ताजी असताना आता पालघर (Palghar Accident) मध्येही असाच एक दुर्दैवी अपघात झाला आहे. पालघर येथे भरधाव कारने सहा पर्यटकांना चिरडल्याची घटना घडली आहे. (Accident news) चिंचणी बीचवरील ही घटना असून यामध्ये सहापैकी पाज जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेसंदर्भात पोलिसांनी (Police) संबधित वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा: दिलासा! नव्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्या जास्त
मिळालेल्या माहितीनुसार, पालघरमधील चिंचणी बीचवर सुट्टीनिमित्त अनेकजण फिरण्यासाठी किंवा पिकनिकसाठी येत असतात. काल 26 जानेवारी सुट्टीनिमित्त बीचवर मोठ्या संख्येने पर्यटकांनी हजेरी लावली होती. मात्र अचानक एक कार चालक भरधाव वेगात कार चालवत होता. त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि काही क्षणात अपघात झाला. या घटनेते कारने तब्बल सहा जणांना चिरडले आहे. यातील सहाही पर्यटक गंभीर जखमी झाले असून एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर बाकीच्या पर्यटकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. जखमी पर्यटकांना चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. दरम्यान चालकासह एकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरु आहे.
दरम्यान, मंगळवारी मध्यरात्री वर्धा जिल्ह्यात अतिशय थरारक आणि अंगाचा थरकाप उडवणार अपघात घडला. वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यातील सेलसुरा गावातील नदीच्या पुलावरुन चारचाकी खाली कोसळल्यानं वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तब्बल सहा विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये आमदार विजय रहांगडाले यांच्या मुलाचाही समावेश आहे. सहा तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा: '..अन्यथा अस्लम शेख यांनी अवमान याचिकेसाठी तयार रहावं'
Web Title: Accident In Palghar Near Beach 5 Tourist Injured One Died
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..