Kolhapur Gunthewari Proposals : महापालिकेच्या दरवाजाशी पुन्हा नागरिकांची गर्दी; गुंठेवारीसाठी प्रस्ताव दाखल करताना कागदपत्रांचा खेळखंडोबा
Major Document Issues : महापालिकेने दिलेल्या नव्या मुदतीत केवळ ४३० प्रस्ताव येताच गुंठेवारी नियमितीकरणातील कागदपत्रांच्या कमतरता आणि शासनाच्या कडक नियमांची अडचण स्पष्टपणे समोर आली.
कोल्हापूर : शहर परिसरातील गुंठेवारीच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी महापालिकेने गुंठेवारी प्रस्ताव सादर करण्यास दिलेल्या तीन महिन्यांच्या मुदतीत ४३० प्रस्ताव दाखल झाले. यापूर्वीच्या दिलेल्या मुदतीत १७१५ प्रस्ताव दाखल झाले होते.