

Kolhapur Hawkers Verification
esakal
कोल्हापूर : झेरॉक्स काढून त्यावर वेगळे नाव टाकून बनावटगिरी, एकाच कुटुंबात दोन-तीन कार्ड, एका कार्डवर ठिकठिकाणी व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना आता महापालिका आळा घालणार आहे. प्रत्येक नोंदणीकृत फेरीवाल्याची पडताळणी करूनच क्यूआर कोडचे बायोमेिट्रक कार्ड दिले जाणार आहे. त्यातून बोगस फेरीवाल्यांना आपोआप चाप बसणार आहे.
शहरात फेरीवाल्यांच्या वाढत्या संख्येची तसेच त्यातून निर्माण होणाऱ्या जागेची समस्या वाढत आहे. पर्यटनस्थळी तसेच विविध महत्त्वाच्या रस्त्यांलगत फेरीवाल्यांची संख्या गेल्या पाच वर्षांत झपाट्याने वाढली आहे. या संख्येमुळे ठिकठिकाणी मोठी कोंडीसारखे वातावरण झाले आहे. यासाठी महापालिका प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलनची मोहीम उघडली आहे. महत्त्वाच्या व वर्दळीच्या रस्त्यांवर कारवाई सातत्याने केली जात आहे. त्यातून नोंदणीकृत संख्या कमी व प्रत्यक्षात हातगाड्यांची संख्या जास्त असा प्रकार पाहायला मिळत आहे. यासाठी नवीन बायोमेट्रिक कार्ड देण्याचा निर्णय घेतला आहे.
या कार्डसाठी जुन्या कार्डधारकांची पडताळणी महत्त्वाची ठरणार आहे. जुने पाच हजारांवरच कार्डधारक असल्याचे प्रशासनाचे मत आहे. त्यामुळे या कार्डधारकांची चौकशी करून त्या-त्या भागातील जागा निश्चित केली जाणार आहे. अनेकांनी कार्डचे झेरॉक्स काढून त्यावर नाव टाकून बोगसगिरी केल्याचे प्रकार आढळले होते. काही कुटुंबातील अनेक सदस्यांच्या नावावर कार्ड आहेत, तर काही फेरीवाल्यांची पूर्वी वेगळी जागा असताना ते सध्या दुसरीकडेच आहेत, अशा साऱ्या प्रकारांना आळा घालण्याचे काम ही पडताळणी करणार आहे.
महापालिकेकडूनच त्या-त्या भागातील कार्डधारकांची पडताळणी केली जाईल. त्यातून योग्य असलेल्या जागानिहाय समजणार फेरीवाला या पडताळणीत संकलित झालेल्या माहितीच्या आधारे संबंधित फेरीवाला कोणत्या भागातील आहे हे स्पष्ट होणार आहे. त्यानुसारच त्याची जागा, छायाचित्र नवीन कार्डवर येणार आहे. त्यामुळे या कार्डनिहायच पुढील कारवाई, फेरीवाल्यांचे नियोजन केले जाणार आहे. यातून मोठा अडथळा दूर होण्यास मदत होणार आहे.
कार्डधारकांना क्यूआर कोडचे नवीन कार्ड दिले जाणार आहे. त्यामुळे योग्य फेरीवाल्यांसाठी योग्य प्रकारचे नियोजन महापालिकेला करता येऊन शहरातील वाहतुकीची होणारी कोंडी कमी करण्यास मदत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.