

कोल्हापुरात अवैध गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश झाला असून पोलिसांनी सोनोग्राफी मशीन जप्त केली आहे.
Esakal
Kolhapur Sonography Machine Seized : बालिंगा (तालुका करवीर) येथे गर्भपात रॅकेटचा आज पर्दाफाश करण्यात आला. गर्भलिंग निदान शोध मोहीम पथकाने छापा टाकून एक एजंट व गर्भ तपासणी करण्यासाठी आलेली महिला यांना ताब्यात घेतले आहे. छापा पडल्याचे समजताच बनावट डॉक्टर स्वप्निल केरबा पाटील (रा. बालिंगा) मागील दारातून पसार झाला. ताब्यात घेतलेल्या एजंटाचे नाव दिगंबर मारुती किल्लेदार (रा. तिटवे, ता. राधानगरी) असे आहे.