
Ambabai Temple Parking
esakal
पार्किंगची सुरुवात:
सरस्वती चित्रपटगृहाजवळील बहुमजली पार्किंग २२ सप्टेंबरपासून सुरू; अंबाबाई मंदिर परिसरातील पार्किंग समस्येवर तोडगा.
शुल्क व क्षमता:
मोटारींसाठी प्रति तास ₹४०, दुचाकीसाठी मोफत; सुमारे ७५ मोटारी व २४० दुचाकींची सोय.
तंत्रज्ञान व सुविधा:
पुढे संपूर्ण पार्किंग एआय व सीसीटीव्हीच्या माध्यमातून नियंत्रित; फास्टटॅग पेमेंट, सुरक्षा व शौचालयांची सोय.
Kolhapur Smart Parking AI : सरस्वती चित्रपटगृहाजवळील बहुप्रतीक्षित बहुमजली पार्किंग सोमवार (ता. २२) पासून सुरू होत आहे. येथे मोटारीसाठी प्रती तास ४० रुपये तर दुचाकीसाठी मोफत असणार आहे. याची पाहणी आज जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांसह पोलिस अधीक्षकांनी केली. नवरात्रोत्सवात हे पार्किंग सुरू व्हावे, अशा सूचना यापूर्वीच देण्यात आल्या होत्या.