

Kolhapur Jal Jeevan Mission
esakal
कोल्हापूर : जलजीवन मिशनच्या कामांना जिल्ह्यात चांगली गती मिळाली आहे. एकूण १ हजार १० योजनांचे नियोजन केले आहे. त्यापैकी ४३७ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. तब्बल ३६९ योजनांची कामे ७५ ते ९९ टक्के पूर्ण झाली असून, या योजना आता अंतिम टप्प्यात आहेत.
जलजीवन मिशनचा मुख्य उद्देश ग्रामीण कुटुंबांना कार्यक्षम घरगुती नळजोडणीद्वारे पाणीपुरवठा करणे हा आहे. जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापनच्या माहितीनुसार योजनेत पाणीपुरवठ्याबरोबरच जलस्रोतांचे बळकटीकरण, पाणी पुनर्भरण, पावसाचे पाणी साठवण आणि सांडपाणी व्यवस्थापनालाही महत्त्व दिले आहे.
उपलब्ध प्रगती अहवालानुसार जिल्ह्यात पूर्ण झालेल्या आणि अंतिम टप्प्यात असलेल्या योजनांची संख्या ८०६ असून, एकूण योजनांपैकी जवळपास ८० टक्के योजनांची कामे पूर्णत्वाच्या दिशेने गेली आहेत. मात्र, उर्वरित योजनांमध्ये कामाचा वेग वाढविण्याचे आव्हान आहे. जिल्ह्यात १,२३७ योजनांचा समावेश असलेला व्यापक आराखडा आहे. यामध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत पूर्वीच्या ८१ योजना, १३ सौर पंपांचा, १२१ अंगणवाडी व शाळांशी संबंधित कामांचा समावेश आहे.
"जलजीवन मिशनमधील १०१० पैकी ४३७ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. ३६९ योजनांचे ७५ ते ९९ टक्के काम पूर्ण असून लवकरच या योजना पूर्ण केल्या जातील."
- अर्जुन गोळे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा, जिल्हा परिषद
तालुका एकूण योजना काम सुरू नसलेल्या २५ टक्के पूर्ण २५ ते ५० टक्के पूर्ण ५० ते ७५ टक्के पूर्ण ७५ ते ९९ टक्के पूर्ण एकूण पूर्ण
आजरा ७४ नाही ०१ ०१ ०२ २६ ४४
भुदरगड ९२ नाही नाही ०३ ०४ ३४ ५१
चंदगड १४९ नाही नाही ०२ ३० ८२ ३५
गडहिंग्लज ८७ नाही ०१ ११ ३७ २२ १६
गगनबावडा ४१ नाही नाही ०१ ०४ १८ १८
हातकणंगले ४४ नाही ०१ ०३ ०५ ०९ २६
कागल ७० नाही नाही नाही ०४ २१ ४५
करवीर १०८ नाही नाही नाही १० ४३ ५५
पन्हाळा १०८ नाही नाही १२ १३ २९ ५४
राधानगरी ९० नाही नाही ०२ १९ ३४ ३५
शाहूवाडी १०५ नाही नाही ०३ २६ ३५ ४१
शिरोळ ४२ ०२ ०३ ०१ ०३ १६ १७
एकूण १०१० ०२ ०६ ३९ १५७ ३६९ ४३७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.