कोल्हापूर : भुस्खलनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी जोतिबा डोंगरला आता देशी झाडांचे अच्छादन

जोतिबा चैत्र यात्रेत प्रशासनाने हा प्रकल्प जाहीर केला होता त्याचे काम आजपासून युध्दपातळीवर सुरू झाले.
जोतिबा डोंगर
जोतिबा डोंगरsakal

जोतिबा डोंगर : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर पावसामुळे भुस्खलनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी आता देशी झाडांचे आच्छादन करण्यात येणार आहे. देवराई नावाचा वॄक्ष प्रकल्प सुरू होत आहे. पूर्ण जोतिबा डोंगरावरील रिकाम्या जागेत आता वड पिंपळ आंबा चिंच जांभूळ आवळा हिरडा झाला ही झाडे लावली जाणार आहेत .त्यामुळे जोतिबाचा डोंगर आता अधिकच हिरवागार व अच्छादीत होणार आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने देवराई नावाचा हा प्रकल्प आजपासून सुरू झाला. जोतिबा चैत्र यात्रेत प्रशासनाने हा प्रकल्प जाहीर केला होता त्याचे काम आजपासून युध्दपातळीवर सुरू झाले.

यंदाच्या पावसापासून जोतिवरील रिकाम्या जागेत पूर्ण क्षमतेणे वृक्षारोपण केले जाणार आहे. या साठी नानासाहेब प्रतिष्ठानने पुढाकार घेतला असून यामध्ये कोल्हापूरसह परिसरातील विविध सामाजिक सेवाभावी संस्था, तरुण मंडळे यांनी काम करण्याची इच्छा दर्शवली आहे. सर्वांच्या सहकाराने पुर्ण क्षमतेने देवराई प्रकल्पाचे काम सुरू होत आहे. पहिल्या टप्यात

जोतिबा डोंगरावर सर्व रिकाम्या जागेत सुमारे सात हजार झाडे लावली जाणार आहेत .सात फूट उंचीची ही सर्व झाडे असून याच झाडांचे वृक्षापण केले जाणार आहे. डोंगरावर चार वर्षे या झाडांची देखभाल दुरुस्ती नानासाहेब प्रतिष्ठान हे करणार आहे .

आज डोंगरावर पाऊस असूनही झाडे लावण्यासाठी खड्ड खोदकाम करण्यात आले उद्यापासून या खडयांमध्ये झाडांचे वृक्षारोपण केले जाणार आहे. दरम्यान,

दिवसें दिवस पावसामुळे भुसंख्लनाच्या घटनेत वाढ होत असून जोतिबा डोंगरावरही मोठ्या प्रमाणात डोंगर पठार आहे. डोंगर उंचावर असल्याने सर्रास पावसाची रिपरिप असते. दाट धुके वारा थंडी हे वातावरण पावसाळ्यात चार महिने राहते. येथील पाण्याचा टाका ठिकाणची जमीनीचे भूस्खंलन होते परिणामी या भागातील रस्ता दरवर्षी तुटून जातो तसेच दरडी कोसळण्याचा धोका वाढत आहे. त्यामुळे भूसंखलनाचा धोका टाळण्यासाठी आता देशी झाडांचा आधार घेतला जात आहे.

जोतिबा डोंगरावर देवराई हा वृक्षारोपण प्रकल्प सुरू होत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून डोंगरावर रिकाम्या जागेत संपूर्ण देशी झाडे लावली जाणार आहेत. या झाडांच्यामुळे जोतिबा डोंगराला एक आच्छादन प्राप्त होईल. त्यामुळे जोतिबाचा डोंगर हिरवागार होईल.तसेच भुस्खलनाचा धोका ही कमी होईल.

शिवराज नायकवडे,सचिव,पश्चिम महाराष्ट्र देवस्थान, समिती कोल्हापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com