

शिंदे गटातील आणखी काही उमेदवारांवर माघारीसाठी दबाव तंत्राचा वापर होण्याच्या शक्यतेने उमेदवारांनाच थेट गोव्याला नेण्यात आल्याची चर्चा रंगली आहे
esakal
Hasan Mushrif Vs Sanjay Mandlik : कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली बिनविरोध नगरसेविका म्हणून सौ. सेहरनिदा नवाज मुश्रीफ यांनी ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि छत्रपती शाहू आघाडीच्या संयुक्त युतीकडून प्रभाग क्रमांक ९ ‘ब’ (ओबीसी महिला गट) या मतदारसंघातून त्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली होती. सौ. मुश्रीफ या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भावाच्या सुनबाई असून त्यांच्या विरोधातील शिंदे गटाच्या उमेदवारासह अन्य एकाने माघार घेतल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या. यावर शिंदे गटाचे प्रमुख नेते माजी खासदार संजय मंडलिक यांच्याकडून याचे खंडण करण्यात आले आहे. दबावटाकून हा निर्णय झाल्याचे त्यांनी मत व्यक्त केले आहे.