kolhapur Kalamba Jail : पळून जाणाऱ्या कैद्यांना चाप लावण्यासाठी कळंबा कारागृहात आता अत्याधुनिक डिजिटल यंत्रणा, काय आहे अलार्म सिस्टीम

Prevent Prisoner Escapes : कायमस्वरूपी बंदी आणण्यासाठी उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा गेट, अलार्म सिस्टीम आणि मोबाईल जामर बसवले जात आहेत.
kolhapur Kalamba Jail

kolhapur Kalamba Jail

esakal

Updated on
Summary

कळंबा कारागृह हायटेक: ६१५ सीसीटीव्ही कॅमेरे, ५० मोबाईल जामर, सुरक्षा गेट्स, अलार्म सिस्टीम आणि बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा बसवून कैद्यांच्या हालचालींवर नियंत्रण.

ई-मुलाखत व व्हिडिओ कॉन्फरन्स: कैद्यांना कुटुंबीयांशी ‘ई-मुलाखत’द्वारे संवाद आणि न्यायालयीन सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे; यामुळे वेळ, खर्च व पोलिस बंदोबस्ताचा ताण कमी.

गुन्हेगारी प्रकारांवर आळा: पूर्वी झालेल्या खून, मोबाईल-जप्ती, पलायनासारख्या घटनांनंतर आता डिजिटल सुरक्षा प्रणालीमुळे कायदा-सुव्यवस्था मजबूत होण्याची अपेक्षा.

Prisoner Escape Attempts : राज्यात अव्वल ठरलेल्या कळंबा कारागृहात अत्याधुनिक डिजिटल यंत्रणा कार्यान्वित करण्यात येत आहे. कैद्यांची सुरक्षा आणि त्यांच्या बेशिस्तीला आळा घालण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. पोलिस बंदोबस्त आणि प्रशासनावरील ताण कमी करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे (व्हीसी) कैद्यांना न्यायालयात हजर केले जात आहे. तसेच पलायन आणि बेकायदा मोबाईल वापरण्यावर कायमस्वरूपी बंदी आणण्यासाठी उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा गेट, अलार्म सिस्टीम आणि मोबाईल जामर बसवले जात आहेत. याशिवाय बंदिजनांची बायोमेट्रिक हजेरी सुरू केली असून, ‘ई-मुलाखत’ सुविधेमुळे कैद्यांना कुटुंबीयांशी संवाद साधता येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com