Kolhapur Lawyer Trapped : वकिलानेच घेतली लाच, प्रांताधिकाऱ्यांच्या नावाने लाखो रूपये उकळत होता...; तक्रारदाराने घडवली अद्दल

Kolhapur Lawyer : तक्रारदाराने २० सप्टेंबरला पुन्हा त्याची भेट घेतली असता, प्रांत कार्यालयात एक लाख रुपये द्यावे लागतील, असे खोटे सांगितले. पण, तडजोडीनंतर २५ हजार रुपये देण्याचे तक्रारदाराने कबूल केले.
Kolhapur Lawyer Trapped

Kolhapur Lawyer Trapped

esakal

Updated on
Summary

लाच घेताना वकिलाला अटक – शाहूपुरीतील ॲड. विनायक सुरेश तेजम (३७) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

प्रकरणाची पार्श्वभूमी – करवीर तालुक्यातील ५७ गुंठे जमीन ‘बी-टेन्युअर’मुक्त करण्यासाठी तक्रारदाराने फेब्रुवारी २०२५ मध्ये अर्ज दिला होता. ॲड. तेजमने करवीर प्रांत कार्यालयात आपली खास ओळख असल्याचे सांगून काम करून देण्याचे आश्वासन दिले.

आधीच मोठी रक्कम घेतली होती – ॲड. तेजम याने याआधीच तक्रारदाराकडून १.६५ लाख रुपये घेतले होते. नंतर आणखी २५ हजार रुपयांची मागणी केली.

Kolhapur Lawyer Trapped in Bribery Case : मिळकतीवरील ब सत्ता प्रकार (बी टेन्युअर) काढण्यासाठी २५ हजारांची लाच घेताना ॲड. विनायक सुरेश तेजम (वय ३७, रा. मंजुळा अपार्टमेंट, शाहूपुरी) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज पकडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com