

Sharangdhar Deshmukh Absent at Mahayuti’s First Meet
esakal
Sharangdhar Deshmukh Absent : ‘राज्यात आणि केंद्रात भाजप आणि मित्रपक्षांचे सरकार आहे. एका विचाराने शहराचा विकास होण्यासाठी कोल्हापूरकरांनी महापालिका महायुतीला दत्तक द्यावी. विकासाची अनेक कामे येथे गतीने केली जातील,’ असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. ‘शंखनाद विजयाचा’ या महायुतीच्या प्रचार सभेमध्ये ते बोलत होते. मिरजकर तिकटी येथे ही सभा झाली.