

लव्ह मॅरेज केल्याच्या कारणावरून सासरकडून छळ आणि पतीची साथ न मिळाल्याने कोल्हापुरातील तरुण आईने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
esakal
Kolhapur Love Marriage Crime : म्हसवे (ता. भुदरगड) येथील विवाहितेने पती, सासूच्या छळाला कंटाळून विषारी द्रव पिऊन जीवनयात्रा संपवली. अम्रिता राहुल खोत (वय २८) असे तिचे नाव आहे. याप्रकरणी पती राहुल राजेंद्र खोत, सासू अनिता राजेंद्र खोत (रा. म्हसवे, ता. भुदरगड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पती, सासूच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद अम्रिताचे वडील अशोक पाटील यांनी भुदरगड पोलिसांत वर्दी दिली.