

Food Poisoning Kolhapur
esakal
Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील सांबरे (ता. गडहिंग्लज) येथे काल दुपारी महाप्रसादानंतर ३०० हून अधिक जणांना विषबाधा झाली. यामध्ये ४० हून अधिक लहान मुलांचा समावेश आहे. या सर्वांना जुलाब व मळमळण्याचा त्रास सुरू झाला. दरम्यान, ही घटना समजताच गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील आरोग्य यंत्रणा उपचारासाठी सज्ज झाली आहे. या रुग्णांमध्ये सांबरे, काळमावाडी, यमेहट्टी, तावरेवाडी या गावांतील ग्रामस्थांचा अधिक समावेश आहे.