European Roller bird sighting in Mahe village
esakal
कुडित्रे (जि. कोल्हापूर) : महे (ता. करवीर) येथील डोंगराळ भागात दुर्मीळ आणि आकर्षक अशा युरोपियन रोलर या पक्षाची प्रथमच नोंद झाली आहे. स्थानिक पक्षी अभ्यासक आणि पक्षी निरीक्षक संग्राम पाटील यांनी या पक्षाचे निरीक्षण करून या भागातील पक्षी विविधतेची नोंद अधोरेखित केली (European Roller Sighting in Kolhapur) आहे. या भागात प्रथमच स्थलांतरित पक्षाचे दर्शन झाले आहे.