
Kolhapur Crime News : वारंवार कर्जे घेणाऱ्या पत्नीचा पतीने गळा चिरून खून केल्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री घडला. अस्मिता परशराम पाटील (वय ४२, रा. महालक्ष्मीनगर, आपटेनगर परिसर) असे तिचे नाव आहे. गेल्या पाच वर्षांत कर्जापोटी स्वतःचे घरही विकण्याची वेळ आल्याने तिचा खून केल्याची कबुली संशयित परशराम पांडुरंग पाटील (वय ४४) याने करवीर पोलिसांकडे दिली आहे. खून केल्यानंतर त्याने स्वतःच फोन करून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात अटक केली आहे.