

शिवाजी पुलावरून त्याने उडी घेतल्याचे काहींनी पाहिले होते. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही तो मिळून आला नव्हता.
esakal
Amid Depression Kolhapur : वयाची तिशी ओलांडूनही विवाह होत नसल्याच्या नैराश्येतून तरुणाने पंचगंगा नदीत उडी मारून आत्महत्या केली. सुमित श्रीकांत तेली (वय ३०, रा. शुक्रवार पेठ) असे त्याचे नाव आहे. याबाबत करवीर पोलिसांनी दिलेली माहिती अशी : सुमित बुधवारी रात्री घराबाहेर पडला होता. शिवाजी पुलावरून त्याने उडी घेतल्याचे काहींनी पाहिले होते. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही तो मिळून आला नव्हता. आज सकाळी अग्निशमन दलाच्या पथकाने त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. करवीर पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.