

Kolhapur Mangav Murder Case
esakal
Mangav Crime News : (अतुल मंडपे ) : माणगाव (ता. हातकणंगले) येथे नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात आरती करून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास मंदिराच्या आवारात ही घटना घडली. स्वरा नितीन उपाध्ये असे मृत मुलीचे नाव असून, ती इयत्ता नववीत शिकत होती. या प्रकरणातील संशयित आरोपी अरुण लगम्मावर (वय ३७, रा. माणगाव) याचा शोध हातकणंगले पोलिसांकडून सुरू होता. हल्ल्यामागील नेमके कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. दरम्यांन स्वराच्या मृत्यूनंतर आज माणगांव बंद व कैंडल मार्चचे आवाहन करण्यात आले आहे.