Kolhapur Mansoon Update : खेकडे घेण्यासाठी खवय्यांची गर्दी...! खेकड्यांची आवक सुरु होण्यासाठी यावर्षी जुलै उजेडला

दरवर्षी जूनमध्येच खेकड्यांची आवक सुरु होते. यावर्षी मात्र जुलै उजेडला
Kolhapur Mansoon Update : खेकडे घेण्यासाठी खवय्यांची गर्दी...!  खेकड्यांची आवक सुरु होण्यासाठी यावर्षी जुलै उजेडला

कोल्हापूर : वातावरणात थंडी, गार वारे, दिवसभर पाऊस अशा वातावरणात जुन्या शिवाजी पुलावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत काळ्या पाठीचा खेकडा विकण्यासाठी विक्रेत्यांबरोबर खवय्यांची गर्दी होती. पावसाची रिपरिप सुरू असूनही खेकड्यांसाठी लांबवरून लोक आले होते. खरेतर, यावर्षी पाऊस दीड महिना उशिरा आला. दरवर्षी जूनमध्येच खेकड्यांची आवक सुरु होते. यावर्षी मात्र जुलै उजेडला.

अडीचशे ते तीनशे रुपयांना आठ ते नऊ मोठे खेकडे अशी विक्री सुरू होती. आकाराने थोडी लहान असलेले खेकडी शंभर, दीडशे रुपयांना घेऊन जा, म्हणून विक्रेते सांगत होते. काहीजण ॲल्युमिनियम, स्टीलचा डबा घेऊन खेकडे घेण्यासाठी आले होते. पन्हाळ्याकडे जाणारे काही पर्यटकही फोर व्हीलर गाडी थांबवून खेकडे घेत होते. पश्‍चिम भागात ज्यांची गावे आहेत, ते लोकही गावाकडे जाताना खेकडी घेऊन जात होते बांबूची टोपली, प्लास्टिकचा कागद, प्लास्टिक पिशवी, बारदान पिशवीतून खेकडे विक्रेत्यांनी खेकडे आणले होते.

Kolhapur Mansoon Update : खेकडे घेण्यासाठी खवय्यांची गर्दी...!  खेकड्यांची आवक सुरु होण्यासाठी यावर्षी जुलै उजेडला
Kolhapur Rain Alert Flood Update : स्वयंमाहिती प्रणालीतून कळणार आपत्तीची अपडेट, पूरपरिस्थितीची माहिती मोबाईल नंबरद्वारे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com