

Kolhapur Municipal Corporation latest political news
esakal
Kolhapur Mayor warning : अंधारात बुडालेले रस्ते, वर्षानुवर्षे चाललेले ड्रेनेज लाईनचे काम, समन्वयाअभावी चांगल्या रस्त्यांची होणारी खोदाई, कचरा उठावसाठी दिरंगाई, भटकी कुत्री-जनावरांमुळे शहरवासीयांचे जीव धोक्यात आलेले असताना प्रशासनाकडून घेतली जाणारी कामचलावू भूमिका यावर नूतन नगरसेवकांनी पहिल्याच सभेत जोरदार हल्लाबोल केला. सहा तास चाललेल्या सभेतील साऱ्यांच्या तीव्र भावना पाहून महापौर रूपाराणी निकम यांनीही ज्या अधिकाऱ्यांना काम जमणार नाही, त्यांनी राजीनामा लिहून ठेवावा, असा इशारा दिला.