

अग्निशमन दलाची यंत्रणा त्याला पकडण्यासाठी ड्रेनेजच्या पाईपलाईनमध्ये, रस्त्यावर धावत राहिली.
esakal
Kolhapur Police : मध्यरात्री दोनचा सुमार. एखादेच वाहन सूनसान रस्त्यावरील शांतता कापत जात होते. अशाच तावडे हॉटेलकडून शहराच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावरून एक आलिशान मोटार धावत होती. अचानकच त्या कारचा एक दरवाजा उघडला आणि त्यातील एकाने पाण्यात सूर मारल्याप्रमाणे रस्त्यावर उडी मारली. अन् जवळपास दीड तासाहून अधिक काळ सहकारी, अग्निशमन दलाची यंत्रणा त्याला पकडण्यासाठी ड्रेनेजच्या पाईपलाईनमध्ये, रस्त्यावर धावत राहिली. अखेर प्राण्यांना जसे जाळे टाकून पकडले जाते, त्याप्रमाणे त्याला पकडले.