
Kolhapur -Miraj -Kalburagi Railway
esakal
कोल्हापूर–मिरज–कलबुर्गी स्पेशल एक्स्प्रेसचा प्रारंभ – नागरिक, रेल्वे प्रवासी संघटना आणि भाविकांची दीर्घकालीन मागणी पूर्ण करत मिरज जंक्शनवर गाडी क्र. 01451/52 सुरू करण्यात आली.
प्रवाशांना दिलासा – सणासुदीच्या हंगामात वाढलेल्या गर्दीमुळे या गाडीने मोठा दिलासा मिळणार असून ती मिरज–कुर्डुवाडीमधील सर्व स्टेशनांसह माढा, मोहळ, सोलापूर, अक्कलकोट रस्ता, दुधनी आणि गाणगापूर रस्ता येथे थांबणार आहे.
तीर्थक्षेत्रांना जोडणारी सेवा – महालक्ष्मी, विठ्ठल-रुक्मिणी, सिद्धेश्वर, स्वामी समर्थ (अक्कलकोट), दत्तात्रेय (गाणगापूर) व शरणबसवेश्वर (कलबुर्गी) ही महत्त्वाची तीर्थक्षेत्रे या गाडीमुळे एकत्र जोडली गेली आहेत; प्रवासी संघटनांकडून ‘देवदर्शन एक्स्प्रेस’ असे नामकरण करण्याची मागणी.
Kolhapur Miraj Railway : कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील नागरिक, रेल्वे प्रवासी संघटना आणि भाविकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आज पूर्ण झाली. कोल्हापूर-मिरज-कलबुर्गी स्पेशल एक्स्प्रेसचा प्रारंभ मिरज जंक्शनवर उत्साहात करण्यात आला. दसरा-दिवाळीच्या गर्दीच्या काळात ही गाडी सुरू केल्यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त केले जात आहे. सणासुदीच्या हंगामात वाढलेल्या प्रवासी गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने गाडी क्र. ०१४५१/५२ सुरू करण्याचा निर्णय घेतला.