esakal | कोल्हापूर: मोटारसायकल चोरटा जेरबंद; पाच दुचाकी जप्त
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर: मोटारसायकल चोरटा जेरबंद; पाच दुचाकी जप्त

कोल्हापूर: मोटारसायकल चोरटा जेरबंद; पाच दुचाकी जप्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: कराड परिसरातून मोटारसायकल चोरून कोल्हापूर जिल्ह्यात विक्रीसाठी आलेल्या संशयितास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने जेरबंद केले. आकाश ऊर्फ सोन्या आनंदा पाटसुपे (वय २८, रा. करडा, सातारा) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पाच दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.

हेही वाचा: कऱ्हाडला तराफ्यावरुन गणेशमुर्तींचे विसर्जन

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाहन चोरीचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास संशयित आकाश ऊर्फ सोन्या पाटसुपे हा मिळून आला. त्याच्याकडून दोन लाख १० हजार रूपये किमंतीच्या पाच मोटारसायकल मिळून आल्या. चौशीत त्याने या मोटारसायकल कराड शहर परिसरातून चोरी केल्याचे सांगितले.

त्याला पोलिसांनी कराड पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर यापूर्वी चार गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव, सहायक फौजदार विजय गुरखे, हिंदुराव केसरे, चंदू नन्नवरे, सचिन देसाई, वसंत पिंगळे, कृष्णांत पिंगळे, दीपक घोरपडे, सोमराज पाटील यांनी केली.

loading image
go to top