कोल्हापूर : स्वच्छतेसाठी खासदार निधी वापरा

२५ वर्षांनंतरच्या लोकसंख्येसाठी नियोजन करा
खासदार निधी वापरा
खासदार निधी वापराsakal

कोल्हापूर : ‘‘शहरे वाढत आहेत. त्यामुळे आता भविष्यातील दहा नव्हे, तर २५ वर्षांनंतरच्या लोकसंख्येचा विचार करून विकासकामांचे नियोजन करा, तरच लोकांना आवश्‍यक असलेला विकास साधता येईल,’’ अशा सूचना केंद्रीय रेल्वे व वस्त्रोद्योग राज्यमंत्री दर्शना जरदोश यांनी केल्या. तसेच, खासदार निधी रस्तेकामांसाठी नव्हे, तर स्वच्छतेच्या कामांना वापरा, असे त्यांनी नूतन खासदार धनंजय महाडिक यांना सांगितले. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री जरदोश यांनी आज महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला खासदार महाडिक यांच्याबरोबर भेट दिली. या वेळी सांडपाणी तसेच घनकचरा प्रश्‍नांवर चर्चा केली. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, माजी महापौर सुनील कदम, माजी नगरसेवक सत्यजित कदम, विजय सूर्यवंशी, अजित ठाणेकर, आशिष ढवळे, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, विजय खाडे, भगवान काटे, वैभव माने आदी उपस्थित होते. त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतिस्मारकासही मंत्री जरदोश यांनी भेट दिली.

खासदार महाडिक यांनी महापालिकेने विकासकामांचे प्रस्ताव तयार करावेत असे सांगितले. माजी महापौर सुनील कदम यांनी कचरा प्रक्रिया प्रकल्प नागरी वस्तीत केल्याने डास, माशांमुळे आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होत असल्याचे सांगितले. तर सत्यजीत कदम यांनी दररोजच्या २५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची मोठी समस्या आहे. अर्ध्या शहरात ड्रेनेज लाईनची गरज असल्याचे सांगितले. मंत्री दर्शना म्हणाल्या, ‘‘सुरत वाढत होते. त्यावेळी महापालिकेत पाच वर्षांचे नियोजन करत होतो. त्यानंतर १० वर्षांचे करू लागलो. आता २५ वर्षांचे करीत आहोत. ज्यावेळी शहरांची वाढ होत असते, त्यावेळी भविष्याचा विचार करून नियोजन करावे लागते. विकासनिधी मंजूर होऊन येण्यासाठी बराच काळ लागतो. त्यामुळे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन जागा निश्‍चित करून त्यांची परवानगी घेऊन ठेवा.’’

... तर महापालिकेला उत्पन्न

मंत्री दर्शना म्हणाल्या, ‘‘करांशिवाय महापालिकांना उत्पनाचे वेगळे स्रोत नाहीत. त्यामुळे विकासकामांसाठी अडचण येत आहे. त्यासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पात प्रक्रिया केलेले पाणी उद्योग, शेतीला दिले तर उत्पन्न मिळेल. सुरतमध्ये केलेले सांडपाणी प्रक्रिया, घनकचरा विघटनचे प्रकल्प लक्षात येणार नाहीत. तिथे गेल्यानंतर दुर्गंधी येत नाही.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com