Kolhapur Mumbai Special Train : दिवाळीत गावी जाणाऱ्यांसाठी खूशखबर! मध्य रेल्वेकडून कोल्हापूर ते मुंबई, कलबुर्गीसाठी विशेष गाड्या जाहीर; पाहा रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक

Kolhapur Mumbai Diwali special train 2026 schedule route : दिवाळीतील वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने कोल्हापूर-मुंबई मार्गावर सहा, तर कोल्हापूर-कलबुर्गी मार्गावर ३२ विशेष फेऱ्या जाहीर केल्या आहेत.
Diwali Special Train 2026

Diwali Special Train 2026

esakal

Updated on: 

कोल्हापूर : दिवाळी व सणासुदीच्या काळात वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेत मध्य रेल्वेतर्फे कोल्हापूरहून मुंबई व कलबुर्गीसाठी विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. कोल्हापूर-मुंबई (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) साप्ताहिक विशेष गाडीच्या दोन्ही दिशेने सहा फेऱ्या, तर कोल्हापूर-कलबुर्गी गाडीच्या दोन्ही दिशेने ३२ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे दिवाळीच्या सुटीत मुंबईसह पश्‍चिम महाराष्ट्र, सोलापूर व उत्तर कर्नाटकाकडे जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com