

Kolhapur Municipal Corporation Clash
esakal
Kolhapur political news : महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे पक्षाचे गटनेते शारंगधर देशमुख व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे गटनेते आदिल फरास यांच्यात आज महापालिकेत महापौरांनी बोलवलेल्या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली. महापौर, उपमहापौर, आयुक्त, इतर पक्षांचे प्रतिनिधी, विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेली वादावादी थांबवण्यासाठी महापौरांना हस्तक्षेप करावा लागला. समिती सभापतिपदाच्या वाटणीवरून यापूर्वीही दोघांत जोरदार वाद झाला होता. आज बैठकीत झालेल्या वादातून महायुतीतील मित्रपक्षांतील धुसफूस उघड झाली.