

Kolhapur Property Regularization
esakal
Kolhapur Mahapalika : कोल्हापूर महापालिकेच्या नवीन सभागृहाच्या उद्या (ता. २०) होणाऱ्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत गुंठेवारी प्रस्ताव सादर करण्यास तीन महिने मुदतवाढीचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. महापौर, उपमहापौर निवडीसाठी विशेष सभा सहा फेब्रुवारीला झाली. आता उद्याच्या सभेपासून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होणार आहे.
विषयपत्रिकेवर स्थायी, परिवहन, महिला बालकल्याण समितीतील सदस्यांची नियुक्ती करण्याचा विषय आहे. स्थायी समितीत १६, परिवहन समितीत १२, तर महिला बालकल्याण समितीत नऊ सदस्यांची नियुक्ती करायची आहे. आठ स्वीकृत नगरसेवकांची घोषणाही केली जाणार आहे.