

कोल्हापूर महापालिका आरक्षणाची लॉटरीची तारीख ठरली
esakal
Kolhapur Municipal Corporation Reservation : कोल्हापूर महापालिका निवडणुकीतील इच्छुकांचे भवितव्य अवलंबून असलेली आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला काढण्यात येणार आहे. आरक्षणाची ही लॉटरी फुटल्यानंतर उमेदवारांच्या तसेच पक्षांच्या हालचाली वेगावणार आहेत. या आरक्षणावर हरकती, सूचना मागविण्यात येतील. राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी मिळाल्यानंतर दोन डिसेंबरला अंतिम आरक्षणाचे गॅझेट केले जाणार आहे. या दरम्यान, सहा नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.