Kolhapur Water Tax Hike : कोल्हापूर महापालिकेचा पहिला दणका! रहिवासी पाणीपट्टीसाठी १० टक्के दरवाढ निश्चित होणार

Kolhapur property water tax news : कोल्हापूर शहरातील रहिवाशांना महापालिकेकडून पाणीपट्टीत १० टक्के दरवाढीचा पहिला दणका बसणार आहे. लवकरच हा निर्णय लागू होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Kolhapur municipal corporation latest tax update

Kolhapur municipal corporation latest tax update

esakal

Updated on

Kolhapur municipal tax update : कोल्हापूर शहरातील पाणीपट्टी दरामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून १८ मार्चला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मान्यतेसाठी सादर होणार आहे. यामध्ये रहिवासी पाणीपट्टीकरिता १० टक्के, व्यावसायिकाकरिता १५ टक्के व औद्योगिकसाठी २० टक्के दरवाढ प्रस्तावित केली आहे. त्याचबरोबर आरोग्य घनकचरा व्यवस्थापनासाठी पहिल्यांदाच सेवा शुल्क आकारण्यासह याच विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध ना हरकत दाखल्यांसाठी सरासरी १० ते १५ टक्के शुल्कवाढीचा प्रस्ताव आहे. या दरवाढीचे चित्र सभेच्या मंजुरीनंतरच स्पष्ट होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com