

Kolhapur Municipal Corporation
esakal
Kolhapur water scam : लाखो लिटर पाण्याची चोरी, गळती, दुरुस्तीसाठी पर्यायी व्यवस्थेचा अभाव, तुटपुंजे तेही मोडके टॅंकर, पाण्यासाठी धावाधाव, पाणीबिले मिळत नसल्याने बुडणारे उत्पन्न, अशी दयनीय अवस्था मांडत आज महापालिकेच्या नूतन सभागृहाच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत नूतन नगरसेवकांनी प्रशासनावर आगपाखड केली. पाणीपुरवठा विभागाचे वाभाडे काढल्यानंतर किमान काही सुधारणा तातडीने करा, असे आदेश महापौर रूपाराणी निकम यांनी दिले.