Rush Expected After Weekend as Seat Sharing
sakal
कोल्हापूर
Kolhapur Election : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत उत्साह शिगेला! दोन दिवसांत तब्बल १०४६ अर्जांची विक्री, प्रत्यक्ष दाखल फक्त तीन
Rush Expected After Weekend as Seat Sharing : कोल्हापूर महापालिका निवडणुकीत अर्ज विक्रीचा विक्रम; प्रत्यक्ष उमेदवारी दाखल मात्र अजूनही संथ, माजी महापौरांपासून नवख्या इच्छुकांपर्यंत सर्वांचीच धावपळ; निवडणूक कार्यालयांत दिवसभर गर्दी.
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी दुसऱ्या दिवशी ५३६ अर्जांची विक्री झाली. दोन दिवसांत १०४६ अर्जांची विक्री झाली आहे. केवळ तीन अर्ज दाखल झाले असून, दोन अपक्ष, एक लोकराज्य जनता पार्टीचा उमेदवार आहे. आज माजी महापौर, पदाधिकारी, नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात अर्ज घेतले आहेत. सर्वात जास्त गांधी मैदान पॅव्हेलियन हॉलमध्ये १३२ अर्जांची विक्री झाली.

