Bribe Case Kolhapur : राबून खाणाऱ्या स्टॉल धारकांना भिती घालून पैसे लाटायचा, भ्रष्ट अधिकारी रंगेहात सापडला अन्, कोल्हापूर महापालिकेत एकच खळबळ

Kolhapur Bribery Case : अतिक्रमण कारवाईची भीती दाखवून पंधराशे रुपयांची मागणी करत दोन हजार रुपये घेतल्याचा आरोप कोल्हापूर महापालिकेच्या एका अधिकाऱ्यावर झाला असून त्याचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे.
Bribery Case kolhapur

Bribery Case kolhapur

esakal

Updated on

Kolhapur : रंग विक्री स्टॉलवर कारवाईची भीती घालून दोन हजारांची लाच घेणाऱ्या महापालिका अतिक्रमण विभाग प्रमुखाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज पकडले. विलास शामराव साळोखे (वय ५५, रा. संतसेना महाराजनगर, फुलेवाडी) असे संशयिताचे नाव आहे. महापालिका इस्टेट विभागाचा अधीक्षक असलेल्या साळोखेकडे अतिक्रमण विभागाचा अतिरिक्त कार्यभार होता. विशेष म्हणजे त्याने १५०० रुपयांची मागणी केली होती तर दोन हजार रुपये स्वीकारताना तो सापडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com