
Kolhapur Municipal Corruption News : ठेकेदाराकडून ८५ लाख वसूल केले जातीलच; पण त्याच्यावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून काळ्या यादीत टाकले जाणार आहे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून झालेल्या चुकांची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त, शहर अभियंत्यांच्या समितीकडून आठवड्यात अहवाल मागितला आहे. गोपनीय असलेली एमबी ठेकेदाराच्या हातात दिल्याबद्दल पवडी अकौंट विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या तातडीने बदल्या करण्याचे आदेश दिल्याचे प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.
प्रशासकीय कामासाठी परगावी गेलेल्या मंजुलक्ष्मी आज महापालिकेत आल्यानंतर त्यांनी या सर्व प्रकरणाची माहिती व कागदपत्रे ताब्यात घेतली. विविध अधिकाऱ्यांशी चर्चा केली. दिवसभर महापालिकेत याच प्रकरणाशी संबंधितांची लगबग सुरू होती.