

₹179 crore revenue deficit
sakal
कोल्हापूर : यंदाचे आर्थिक वर्ष संपण्यास जवळपास दीड महिनाच शिल्लक असताना महापालिकेचे वार्षिक उत्पन्न मात्र ७२ टक्क्यांवरच आहे. उद्दिष्टापेक्षा १७९ कोटींची तूट आत्ताच दिसत असून, गेल्यावर्षी १०० कोटींहून अधिक तूट होती. त्यामुळे यंदा वसुलीचे प्रमाण वाढवून तूट कमी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.