

Political leaders campaign aggressively ahead of crucial ZP elections in Kolhapur.
sakal
कोल्हापूर : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या आहेत. चंदगड नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमदार शिवाजी पाटील यांच्या विरोधात स्थापन झालेल्या राजर्षी शाहू विकास आघाडीत अवघ्या महिनाभरातच मतभेद निर्माण झाल्याने आघाडीतील काँग्रेसचे प्रदेश सदस्य गोपाळराव पाटील भाजपच्या छावणीत दाखल झाले.