kolhapur
kolhapursakal

Kolhapur News : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; पोलिसांनी केली अटक

न्यायालयात हजर केले असता त्याला बुधवार (ता.२५) पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

कोल्हापूर - लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार
केल्याप्रकरणी इम्रानखान शेरखान पठाण (वय २५, रा.जूनी म्हाडा कॉलनी, आर.के.नगर) याला पोलिसांनी अटक केली.

न्यायालयात हजर केले असता त्याला बुधवार (ता.२५) पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावीस वर्षाची ही तरुणी गेल्या वर्षी कोल्हापुरात आली होती. कामाला जात असताना रस्त्यात तिची इम्रानखान पठाण याच्याशी ओळख झाली. इम्रानखान यानं ओळखीचा गैरफायदा घेऊन तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

kolhapur
Kolhapur News : पोलिसांचे बनावट शिक्के करणाऱ्यांना अटक

तिला लग्नाचं आमिष दाखवून वर्षभर तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिचे मोबाईलवर अश्लिल फोटो काढून ते व्हायरल करण्याची भीती घालून जीवे मारण्याची धमकी दिली. पिडीत तरुणीच्या फिर्यादीवरून आज इम्रानखानला लक्ष्मीपुरी पोलिसांनी बुधवारी (ता.१८) रात्री अटक कली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com