
Kolhapur Crime
esakal
महेश राख खून प्रकरणातील संशयितांची फेरफटका तपासणी
१३ सप्टेंबरला झालेल्या महेश राख खून प्रकरणातील अटक केलेल्या आठ संशयितांना (सोहम शेळके, बालाजी देऊळकर, जुनेद पाटील, मयूर कांबळे, पियूष पाटील, अदित्य गवळी, सद्दाम कुंडले, धीरज शर्मा) आज घटनास्थळी नेऊन तपास करण्यात आला.
घटनास्थळी तपास व गर्दी
गंगाई लॉन, दत्त कॉलनी परिसर, ज्योती पेट्रोल पंप अशा ठिकाणी त्यांना फिरवून त्यांनी खूनाची जागा व पळून जाण्याचा मार्ग पोलिसांना दाखवला; पाहणाऱ्यांची मोठी गर्दी झाली.
मुख्य संशयित अद्याप फरार
मुख्य संशयित सिद्धार्थ गवळी व ‘मगर’ हे अजून पोलिसांच्या ताब्यात नाहीत; लवकरच त्यांना अटक होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.
Kolhapur Police : ज्या ठिकाणी दहशत माजविली, त्याच फुलेवाडी रिंगरोडवर महेश राखच्या खुनातील संशयित आठ जणांना आज फिरवण्यात आले. गंगाई लॉन ते रिंगरोडवरून दत्त कॉलनी परिसरात आज सायंकाळी फिरवत असताना बघ्यांची गर्दी झाली. ज्या ठिकाणी खून केला, कोठून पळून गेले याची माहिती त्यांनी घटनास्थळावर करवीर पोलिसांना दिली.