Minister Nitin Gadkari
esakal
कोल्हापूर : पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कागल–सातारा या अंतरातील पंचगंगा नदीवर उभारण्यात येणाऱ्या सहा पदरी पिलर उड्डाणपुलाच्या प्रस्तावास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली.