Kolhapur Panhala Crime News : पन्हाळ्यात खळबळ! घरात घुसून दिराने केला वहिनीचा निर्घृण खून; अनैतिक संबंधाच्या संशयातून थरार

Pooja Dabhade Killed in Knife Attack : काखे येथे घरात एकटी असलेल्या पूजा दाभाडे यांच्यावर दिराने धारदार चाकूने हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केल्यानंतर अतिरक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला.
woman killed by brother-in-law in Kolhapur

woman killed by brother-in-law in Kolhapur

esakal

Updated on

कोडोली : काखे (ता. पन्हाळा) येथे अनैतिक संबंधातून एका विवाहितेचा दिराने घरात घुसून निर्घृण खून केला. त्याने विवाहितेवर धारदार चाकूने सपासप वार (Panhala woman murder news) केले. काल दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला. पूजा अविनाश दाभाडे (वय ३३, रा. काखे) असे मृत महिलेचे नाव आहे. हल्ल्यानंतर दीर सुरेश मधुकर दाभाडे (३५, रा. काखे) घटनास्थळावरून पसार झाला. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे गावात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com