

कोल्हापूरातील परीख पुलाच्या रस्त्याचे काम अखेर सुरू झाले आहे. एका बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात आली
esakal
Traffic Closed Kolhapur : महापालिकेने आज परीख पुलाजवळ काँक्रिट रस्त्याचे काम सुरू केल्याने जेम्स स्टोन इमारतीजवळून राजारामपुरीकडे जाणारी एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे तेथील वाहतुकीचा गोंगाट कमी झाला असला, तरी बहुतांश वाहनधारकांनी शाहूपुरीतून जाण्याचा मार्ग निवडल्याने गोकुळ हॉटेल ते गवत मंडईपर्यंतच्या रस्त्यावर तसेच स्टेशन रोडवर दिवसभर वाहतुकीची कोंडी होत होती.