
kolhapur Fire Station Slab Collapse
esakal
मुख्य मुद्दे (Highlights)
फुलेवाडी अग्निशमन इमारतीचा स्लॅब कोसळल्याने कामगार जखमी.
निष्काळजीपणाबद्दल ठेकेदारावर गुन्हा दाखल.
ठेकेदाराला पोलिसांनी अटक करून पुढील चौकशी सुरू.
Kolhapur Accident News : फुलेवाडी फायर स्टेशनच्या इमारतीचा स्लॅब कोसळून नवनाथ आण्णा कागलकर (वय ३८, रा. शाहूनगर, राजारामपुरी) यांचा मृत्यू झाला. मंगळवारी रात्री घडलेल्या घटनेप्रकरणी ठेकदार शशिकांत दिलीप पोवार (३६, रा. राजारामपुरी) याच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात आज सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला. त्याला अटक झाली आहे. याबाबत महापालिकेचे कनिष्ठ अभियंता प्रमोद सुधीर बराले यांनी याबाबत फिर्याद दिली. दरम्यान, दुर्घटनेतील सात जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.