

Kolhapur crime control special police operation news
esakal
Kolhapur crime operation : खुनाचा प्रयत्न, मारामारीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या संशयिताकडून दहशतीसाठी पिस्तुलाचा वापर केला जात होता. ऋषिकेश ऊर्फ सोन्या रामू कुऱ्हाडे (वय २७, रा. राजारामपुरी १४ वी गल्ली) असे त्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेने त्याला अटक करून ५० हजार रुपये किमतीची पिस्तूल जप्त केली. ही पिस्तूल पुरविणाऱ्या विकास देवदास वाघमारे ऊर्फ पांडा शेट याच्यावरही गुन्हा दाखल झाला.