Kolhapur Police : तरुणीवर हल्ला प्रकरण, हत्यारे घेऊन दहशत माजवणाऱ्या टोळक्याची ‘मस्ती जिरवली’; कोल्हापूर पोलिसांची कारवाई

Kolhapur Crime : तरुणीवर हल्ला करून हत्यारे घेऊन दहशत माजवणाऱ्या टोळक्याविरुद्ध कोल्हापूर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. आरोपींना ताब्यात घेऊन हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.
Kolhapur Police

तरुणीवर हल्ला करून हत्यारे घेऊन दहशत माजवणाऱ्या टोळक्याविरुद्ध कोल्हापूर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.

esakal

Updated on

Kolhapur Police News : कोयता, चाकू घेऊन टोळक्याने रत्नागिरी महामार्गावर दहशत निर्माण केली. बावीस वर्षीय तरुणीवर हल्ला केल्यानंतर भररस्त्यावर वाहनधारकांनाही हत्यारे दाखविण्याचा प्रकार मंगळवारी घडला होता. करवीर पोलिसांनी याप्रकरणी पाच संशयितांना पकडले. दहशत करण्याचा प्रकार केलेल्या ठिकाणीच या संशयितांना आज सायंकाळी फिरविण्यात आले. टोळक्याकडून माफीनामा लिहून घेत त्यांची मस्ती जिरवली. याची चर्चा सायंकाळनंतर घटनास्थळी सुरू होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com