
कोल्हापुरात गोवा बनावटीची दारू जप्त
esakal
Highlight Summary Points:
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करताना दोघांना रंगेहात पकडले.
नवीन वाशी नाक्याजवळ कारवाई; सात लाख ५१ हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
गोवा बनावटीच्या दारूवर महाराष्ट्रात बंदी असतानाही संशयितांकडून मोठ्या प्रमाणात वाहतूक.
Kolhapur Police seized Liquor : गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने दोन संशयितांना अटक केली. शुभम शिवकुमार साळुंखे (वय २८) आणि आशुतोष हिंदुराव साळुंखे (२७, रा. जाधवनगर, आंधळी, ता. पलूस, जि. सांगली) अशी त्यांची नावे आहेत.