

हुपरी पोलिस ठाण्यातील कर्मचारी संदेश शेटे याच्यासह पंटर ७० हजार रुपयाचे लाच घेताना जाळ्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे.
esakal
Kolhapur Police Crime : बाळासाहेब कांबळे : तीन पानी जुगार अड्यावर छापा टाकलेल्या गुन्ह्यातील अटक कारवाई टाळण्यासाठी सत्तर हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलिसांच्या एका पंटरला लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. कारवाईची कुणकुण लागताच लाचेची मागणी करणारा पोलिस फरार झाला आहे. पट्टणकोडोली येथे आज शनिवारी ही कारवाई केली. रणजीत बिरांजे ( रा. पट्टणकोडोली) असे लाच स्वीकारणाऱ्या पंटरचे तर संदेश शेटे असे लाचेची मागणी करणाऱ्या पोलिसाचे नाव असून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.