
पोलिसानेच महिलेसोबत नको ते केलं अन् आता...
esakal
हायलाइट्स :
पोलिस हवालदार सुनील बळीराम कुंभार (४७, रा. तळसंदे, सध्या नेमणूक चंदगड पोलीस ठाणे) याच्यावर गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
लग्नाचे आमिष दाखवून महिलेबरोबर वेळोवेळी अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप.
लग्नास नकार दिल्यानंतर व मारहाणीची धमकी दिल्याने पीडित महिलेने फिर्याद दाखल केली.
Kolhapur Police Officer : ‘मी तुला आयुष्यभर सांभाळतो, तुझ्या संपर्कात राहतो. तुझ्याशी लग्न करतो’, असे आमिष दाखवून वेळोवेळी अनैतिक संबंध ठेवून लग्नास नकार दिल्याने पोलिस हवालदार सुनील बळीराम कुंभार (सध्या नेमणूक चंदगड पोलिस ठाणे (वय ४७, रा. तळसंदे) याच्यावर गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याबाबतची फिर्याद पीडित महिलेने दिली आहे.