
गुन्हेगार समीन आब्बास पानारीने पोलिस डिपार्टमेंट बदनाम केलं आहे.
esakal
तीन हायलाइट पॉइंट्स :
अकलूजमध्ये ६५ लाखांची खंडणी मागणी – गुन्हेगार समीन आब्बास पानारीने लक्ष्मण बंदपट्टे व १३ साथीदारांचा मोका रद्द करण्यासाठी खंडणी मागितली; पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलीसांचा सहभाग – कोल्हापूर पोलिस मुख्यालयातील सहायक फौजदार मिलिंद नलवडे याचा या खंडणी प्रकरणात सहभाग उघडकीस आल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई.
टोळीतील गुन्हेगारांची ओळख – चौकशीत सतीश सावंत, मिलिंद नलवडे, कमलेश कानडे, लालासाहेब अडगळे यांची नावे समोर आली; खंडणी मागणी प्रकरणातील गुन्हा दाखल करून चौकशी सुरू.
Kolhapur Crime News : अकलूज येथील सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर मोकाअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे आला होता. हा प्रस्ताव रद्द करतो, असे सांगून गुन्हेगाराकडेच ६५ लाखांची खंडणी मागण्याचा प्रकार समोर आला. या टोळीत कोल्हापूर पोलिस मुख्यालयातील सहायक फौजदार मिलिंद नलवडे याचा सहभाग समोर आल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई झाली. पोलिस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी हा आदेश दिला.