
"Kolhapur police file cases against 41 mandals for loud sound during Ganesh Visarjan procession."
Sakal
कोल्हापूर: शरीराची कंपने अन् हृदयाची धडधड वाढविणारा आवाज विसर्जन मिरवणुकीत अनुभवताना अनेकांना घाम फुटला. लहान मुले, महिला, वृद्धांना विसर्जन मार्गावरून बाहेर पडताच याचा त्रास जाणवत होता. सायंकाळी पाचनंतर वाढत गेलेल्या आवाजाने मर्यादा ओलांडल्या. पोलिसांनीही सर्वच साउंड सिस्टीमच्या आवाजाचे नमुने घेतले होते. शहरातील ४१ मंडळांवर कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मंडळाचे पदाधिकारी, साउंड सिस्टीम मालक, वाहन मालकांवर ही कारवाई केली जाणार आहे.